रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब

भाजप प्रवेशाची चर्चा;पुढचे सहा दिवस चेन्नईत चाहत्यांशी साधणार संवाद

टीम महाराष्ट्र देशा- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. यासंबंधित अधिकृत घोषणा येत्या ३१डिसेंबरला करणार असून ‘थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच हा मोठा विजय आहे’, असे सांगत राजकारणात एन्ट्री करणार असल्याच स्पष्ट केलं आहे .

आजपासून पुढचे सहा दिवस रजनीकांत चेन्नईत त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले असून त्यासाठी चाहत्यांना ३१ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीसाठी आले आहेत.