फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे- सुप्रिया सुळे

विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र ; गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले - धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा- भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री निधन झाले.सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याशिवाय विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं असून पाटील यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याची टीका केली जात आहे.

bagdure

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे.-अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

You might also like
Comments
Loading...