मानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदी दोषी; मेहंदीला दोन वर्षाची शिक्षा

daler-mehndi

टीम महाराष्ट्र देशा- प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याला दोन वर्षा कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. 2003मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात आज त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पंजाब मधील पटियाला कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता.

Loading...

नेमकं काय आहे प्रकरण
मेहंदी बंधु १९९८ आणि १९९९ साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदरित्या दहा जणांना अमेरिकेत घेऊन गेले. बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन पतियाळा पोलिसांनी २००३ साली दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोन भावांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.पतियाळा पोलिसांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या ऑफीसवर छापा मारुन कागदपत्रेही जप्त केली होती. २००६ साली पतियाळा पोलिसांनी न्यायालयात दलेर मेहंदी निर्दोष असल्याच्या दोन याचिका दाखल केल्या होत्या. पण मेहंदी बंधुविरोधात सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला पुढे चालवण्याचा निर्णय घेतला.अवैधरित्या अशी मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर मेहंदीला जामीन देखील मिळाला असून आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत असं मेहंदीने स्पष्ट केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'