fbpx

शहर मध्य  विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें

सोलापूर ( सूर्यकांत आसबे) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय चर्चांना ऊत येऊ लागला आहे. सोलापुरात तर राजकारण हाच आता एकमेव चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडे असलेला मास्तर शहर मध्य मतदार संघ माकपने मागितला असल्याची चर्चा आहे, आणि याबाबत आपणास काय वाटते असे याच मतदार संघाच्या गेली दोन टर्म आमदार असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना विचारले असता त्यांनी शहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा मतदार संघ असून या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आपण विकासकामे केली असल्याने आपण हा मतदार संघ सोडणार नाही असे सांगत याच मतदार संघातून हॅटट्रिक करण्याचा संकल्प माध्यमांसमोर बोलून दाखविला आहे.
शहर मध्य मतदार संघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी दोनवेळा निवडणूक जिंकली आहे. दोनही निवडणुकीत त्यांनी भाजप, शिवसेना, माकप आणि एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. या मतदार संघात एकेकाळी माकपचे वर्चस्व होते. त्यानंतर एमआयएम ने शिरकाव केला. मागील निवडणुकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी एमआयएमकडून निवडणूक लढविताना आमदार प्रणिती शिंदे यांना पुरता घाम फोडला होता.
गेल्या दहा वर्षात आमदार प्रणिती शिंदे यांनी या मतदार संघात मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा आमदार शिंदे याच मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. मात्र काँग्रेस आणि माकपची आघाडी झाल्यास शहर मध्य मतदार संघ आपल्या पदरात पडून घेण्यासाठी आडम यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. खरे तर तसे होईल असे आपणास वाटत नसल्याचे खुद्द आमदार प्रणिती शिंदे म्हणत आहेत.

1 Comment

Click here to post a comment