रामदेव बाबांची टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री, लाँच केले पतंजलीचे सिमकार्ड

आकर्षक प्लान मध्ये डेटा तर मिळणारच पण सोबतच मिळणार मेडिकल लाइफ इन्शुरन्स

टीम महाराष्ट्र देशा- नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारे योगगुरु बाबा रामदेव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कोणताही वाद नव्हे तर बाबांनी आता थेट टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ या नावाचे बाबांनी सिम कार्ड लाँच केले आहे.

भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे कार्ड लाँच केले आहे. मात्र सध्या हे कार्ड फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल सामान्य नागरिकांना यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. या सिम मध्ये 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर यूजरला 2GB डेडा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. बीएसएनएलच्या पाच लाख काउंटर्स मध्ये लवकरच उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे बाबांनी स्पष्ट केलं.

पतंजली सिमचे फायदे
– फक्त 144 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच 2GB डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे.
– या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर 10% सूट दिली जाणार आहे.
– एवढेच नाही तर या सिमच्या यूजरला 2.5 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स तसेच 5 लाख रुपयापर्यंतचे लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.

– विम्याची रक्कम फक्त रस्ता दुर्घटनेसाठी मिळणार आहे.

You might also like
Comments
Loading...