माढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा ?

माढा : लोकसभा मतदारसंघामध्ये 2014च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते – पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे व विद्यमान मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सरळ सरळ लढत झाली होती. यामध्ये स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी विजयसिंह मोहिते – पाटील यांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थिती सोडायचा नाही असे खासदार राजू शेट्टी यांनी ठरवल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. स्वाभिमानीकडून सध्या रवीकांत तुपकर, अनिल पवार यांच्यासह एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱयाच्या नावाचा उच्चार केला जात आहे.

Loading...

माढा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे चांगलेच वर्चस्व आहे. ऊस प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना या पट्ट्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलने करत आहे. त्यातच सातारा जिह्याचे फलटण, माण हे दोन तालुके या लोकसभा मतदार संघास जोडले गेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानीचा उमेदवार यावेळी निवडून येण्याची चिन्हे दिसत आहेत. तशी फिल्डिंग देखील खासदार राजू शेट्टी यांनी लावली आहे.

सध्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यावर राष्ट्रवादीतून चांगलीच नाराजी आहे. त्यामुळेच शेट्टी यांनी कसल्याही परिस्थिती हा मतदार संघ सोडायचा नाही असे ठरवले आहे. त्या दृष्टीने शेट्टी हे माढा मतदारसंघात सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने या मतदार संघात राजू शेट्टी अनेकांच्या गाठी भेटी घेत आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते – पाटील यांनी विजय मिळवला. परंतु त्यांच्या खालोखाल स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना दोन नंबरची मते मिळाली. त्यामुळे या मतदार संघावर शेट्टी यांचे चांगलेच लक्ष आहे. या लोकसभा मतदार संघात करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला हे चार तालुके सोलापुर जिह्यातील आहेत. यापूर्वी या ठिकाणी भाजपाचे वातावरण नव्हते. परंतु विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबाबत गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच साताऱयातील माण आणि फलटण या दोन्ही तालुक्यात विद्यमान खासदार फिरकत नसल्याने प्रचंड नाराजी आहे. त्याचाच फायदा घेऊन राजू शेट्टी स्वाभिमानीचा उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीकडून सध्या रवीकांत तुपकर, अनिल पवार यांच्यासह एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱयाच्या या तीन नावांचा उच्चार केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हि जागा स्वाभिमानीकडे ठेवण्यास यशस्वी झाले तर माढा लोकसभेची निवडणूक रंगदार होणार आहे. त्यात उमेदवार कोण असणार हे पण पाहण्यासारखे आहे.Loading…


Loading…

Loading...