fbpx

मणिशंकर अय्यर विरोधात खा. साबळेंची पोलिस तक्रार

amar-sable

पुणे-  विवादास्पद विधानातून संकटांना आमंत्रण देणारे माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आहे. पुण्यातील राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांनी अय्यर यांच्या विरोधात स्थानिक निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या 7 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द उद्गारल्याबद्दल काँग्रेसमधून निलंबित झालेल्या अय्यर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या विरोधात खालच्या पातळीची भाषा वापरणा-या अय्यर यांच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी खा. साबळे यांनी पोलिस तक्रार केलीय.

या तक्रारीत नमूद केल्यानुसार काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पतंप्रधानांच्या विरोधात जातियवादी टीका करताना नरेंद्र मोदी नीच आदमी है असे म्हंटले होते. तसेच पंतप्रधानांबद्दल नींच आदमीआणि असभ्य अशा शब्दांचा प्रयोग अय्यर यांनी केला आहे. अय्यर यांच्या विधानाची देशभरात निंदा होते आहे. विशेषत: दलित समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या विवादास्पद विधानांमुळे समाजातील जातीय सलोखा बिघडून वातावरण दूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे अय्यर यांच्या विरोधात भादंविचे कलम 298,499,500,120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी खा. साबळे यांनी केली आहे. तक्रार दाखल करताना साबळे यांच्यासह आ. महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या सरचिटणीस उमा खापरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष शैला मोळक, केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, रसचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चाचे संभाजी फुगे, सुभाष सरोदे, मनोज तोरडमल, भाई सोनवणे, विशाल वालुंजकर, वैजनाथ शिरसाठ इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खा. साबळे म्हणाले की, अय्यर यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानांची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे जगात पंतप्रधान मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यासोबतच देशातीच दलित, उपेक्षित आणि वंचित घटकांबद्दल काँग्रेसच्या मनात काय भावना आहेत हे देखील स्पष्ट झाले आहे. पंतप्रधांनी गेल्या तीन वर्षात केलेला विकास पाहुन काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अय्यर सारखे लोक अशाप्रकारची घृणित वक्तव्ये करीत आहेत. तेव्हा यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील खा. साबळे यांनी केली. हीच काँग्रेसची खरी संस्कृती निगडी पोलिसात अय्यर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हिंदुस्थान समाचारशी बोलताना खा. साबळे यांनी सांगितले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा छळ करणा-या काँग्रेसने गेल्या 70 वर्षात दलितांचा वापर केवळ सत्ताप्राप्तीसाठी केला आहे. वास्तवात दलितांचा द्वेष करणे ही काँग्रेसची मुळ प्रवृत्ती आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या घृणास्पद टीकेनंतर काँग्रेसचा खरा चेहरा जगापुढे आला आहे.

2 Comments

Click here to post a comment