जम्मू-काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर, गंभीरने आफ्रिदीला फटकारले

afridi-gambhir

टीम महाराष्ट्र देशा- नो-बॉलवर मिळालेली विकेट आफ्रिदी सेलिब्रेट करत आहे असं ट्वीट करत भारताचा धडाकेबाज सलामीवीर गौतम गंभीरने काश्मीरबाबत वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रीदीला फटकारले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्या नंतर पाकिस्तान सरकारचा तिळपापड झाला असताना पाकचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही दहशतवाद्यांची बाजू घेतली होती.

काय म्हणाला होता आफ्रिदी त्या ट्वीट मध्ये
भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये जी सद्यस्थिती आहे ती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. तेथे स्वातंत्र्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथील जुलमी शासनकर्त्यांकडून निर्दोष व्यक्तींना मारले जात आहे. हे सर्व पाहून संयुक्त राष्ट्र संघ आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत?, असा मला प्रश्न पडला आहे असे नमूद करत हा रक्तरंजित संघर्ष का थांबवला जात नाही?

नो-बॉलवर मिळालेली विकेट आफ्रिदी सेलिब्रेट करत आहे.गौतम गंभीरचा टोला .

माध्यमांनी माझ्याकडे शाहीद आफ्रिदीच्या काश्मीरबाबत केलेल्या विधानाविषयी प्रतिक्रिया विचारली. आफ्रीदी केवळ युएन कडे पाहत आहेत, मात्र त्याच्या दृष्टीने युएन याचा अर्थ ‘अंडर 1 9’ आहे. मीडियाने हा विषय फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. तो नो बॉलवर मिळालेली विकेट सेलिब्रेट करत आहे.