न्यायालयाचे निर्देश पाळा, आम्ही शांत राहू- राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा – .एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे निर्देश पाळा, तसं झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

bagdure

फेरीवाल्यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीनं कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं

 

You might also like
Comments
Loading...