आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय

backpain

पाठदुखी आकारणेणि मानदुखी हल्ली या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. बदलती जीवनशैली हे यामागचे मूळ कारण आहे. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. रात्री उशीरा जेवणे, उशीरा झोपणे, झोपेचे समाधान नसणे, सकाळी उशीरा उठणे, पचन नीट न होणे, पोट साफ न होणे, भूक नीट न लागणे, उत्साह नसणे, जीवघेणा प्रवास, त्यासाठी वाहनाचा वापर, रस्त्यांची दयनीय परिस्थिती, यामुळे मानदुखी, पाठदुखी झाली नाही तरच नवल!

Loading...

Backache and neckache

अर्थात या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी किंबहुना तो होऊ नये म्हणून, जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. सायंकाळी घरी आल्यावर नाश्ता किंवा चहापाणी न करता सरळ लवकर जेवावे. भात, भाकरी, भाजी, वरण असा हलकाच आहार घ्यावा. जास्तीत जास्त ८ वाजेपर्यंत जेवण पूर्ण व्हावे. फार उशीर न करता १० वाजेपर्यंत झोपावे.

पाठदुखी आणि मानदुखी : उपाय

सकाळी किमान सूर्योदयापूर्वी उठावे. पोट साफ झाल्यावर, व्यायाम, योगाभ्यास करावा. संपूर्ण अंगाला शुद्ध बला किंवा बला तेल लावून स्नान करावे. सकाळी नाश्ता म्हणून फक्त देशी गायीचे दूध शतावरी कल्प घालून घ्यावे. भूक भागत नसल्यास, सकाळी फक्त वरण / आमटी भात खावा व पोळी भाजीचा डबा बरोबर न्यावा. बटाटा, मोडाच्या उसळी, मटार, फ्लॉवर, चीज, पनीर, मसालेदार पदार्थ इत्यादिकांचे सेवन टाळावे. पाणी उकळून प्यावे. आत्ता पावसाळा असल्याने, या ऋतूत वात दोष वाढतो, त्याने या तक्रारी वाढतात, म्हणून शक्यतो तज्ञ वैद्यांकडून बस्ती चिकित्सा घ्यावी. व्यक्तीनुरूप निदान करून योग्य ती चिकित्साही करता येते. त्यासाठी दवाखान्यात संपर्क साधावा.

योगासने, प्राणायाम, मानेचे, कमरेचे व्यायाम यांचाही मानदुखी, पाठदुखी या आजारात चांगला फायदा होतो. त्यासाठी त्यातल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र या दुखण्यांसाठी केवळ मलमे लावणे, वेदनाशामक गोळ्या घेत राहणे, दुखणे अंगावर काढणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. मूळ कारणांचा शोध स्वतःच घ्यावा आणि ती कारणे टाळावीत. जरूर तेथे तज्ञ वैद्याचे मार्गदर्शन घ्यावे.

yog

देशी गायी उन्हात हिडत असल्याने, त्यांच्या कातडी खाली ‘ड’ जीवनसत्त्व नैसर्गिकपणे तयार होऊन, दुधा-तुपातून आपल्याला सहजपणे मिळत होते. जर्सी गायींना ऊन सोसत नसल्याने, आणि त्या फिरल्या तर त्यांचे दूध कमी होत असल्याने, त्यांना सावलीतच बसवून ठेवले जाते. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची मोठ्या प्रमाणात कमतरता समाजात दिसून येत आहे. यावर खरे तर पुन्हा देशी गायीच्याच दुधा-तुपाचाच वापर सूरु करणे हेच खरे उत्तर आहे. किंबहुना शाकाहारी लोकांसाठी ‘ब१२’ जीवनसत्त्व मिळवण्याचाही तोच मार्ग आहे. त्याचीही कमतरता समाजात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

येथेही मूळ कारणांचा शोध न घेता, कंपनीने बनविलेले ‘ड’ जीवनसत्त्व किंवा ‘ब१२’ जीवनसत्त्व समाजापर्यंत पोचविण्याचा उद्योग सर्वत्र चालू आहे. नैसर्गिक ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, सहजपणे मोडणे, हाडात दुखणे अशा तक्रारी उद्भवतात. तरुण वयातच या तक्रारी सुरु होतात, आणि त्यावर तात्पुरते वेदना कमी करणारे उपाय केले जातात आणि दुखणे हाताबाहेर गेले की मगच आयुर्वेदाच्या मूलगामी व सर्वांगीण उपायांचा अवलंब अनुभवी रुग्णाकडून त्याविषयी माहिती मिळाल्यासच केला जातो. मुळातच आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अंगीकार करून, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे.

याप्रमाणे जीवनशैलीत बदल केल्यास, केवळ मानदुखी, पाठदुखीच नव्हे, तर अन्य आजारापासुनही मुक्ती मिळेल आणि आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त होईल.

वैद्य दिलीप गाडगीळ

संपर्क क्र.०२०-२५४४७३१०० / ७७६७९९९३३६ / ०२०-२४४७५३६० / ७७६७९९९३३५Loading…


Loading…

Loading...