fbpx

मुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईच्यां मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या बाबत निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संजय निरुपम म्हणाले की, एकाच व्यक्तीच्या नावे ११ ते १३ मतदान ओळखपत्रं आढळून आली असून मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे.

तसेच एखाद्या मतदारसंघात एकच मतदार, पण त्याच्या विविध जाती-धर्माची वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वयोमर्यादा, वेगवेगळे बूथ नंबर मिळालेले आहेत असा दावा निरुपम यांनी यावेळी केला. त्यामुळे अशा बोगस मतदारांची संख्या वाढणे ही चिंताजनक बाब आहे.ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

1 Comment

Click here to post a comment