ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगला श्री क्षेत्र नेवासा येथे राज्यातील पहिला रिंगण सोहळा

blank

टीम महाराष्ट्र देशा : पंढरपूरला जाणाऱ्या श्री देवगड येथील श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पायी पायी पालखी दिंडीचे शनिवारी दि.७ जुलै रोजी माऊलीच्या नेवासेनगरीत दुपारी २.३० वाजता आगमन झाले.या दिंडीचे फटाक्यांच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.यावेळी राज्यातील पहिला रिंगण सोहळा ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात पार पडला.

दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देवगडहुन काल निघालेल्या या दिंडीचा रात्री खडका गावात मुक्कामास होती. आज सकाळी सदरची दिंडीचे नेवासनगरीकडे प्रस्थान केले सकाळी १० वाजता व्यापारी नळकांडे यांच्या मळयात आगमन झाले तेथे दिंडीचे स्वागत नळकांडे परिवाराच्या वतीने करण्यात आले येथेडी दिंडीला भोजन देण्यात आले.

नेवासा येथे एस.टी. स्टँड प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यानंतर एस.टी. आगार व्यवस्थापक प्रियंका उन्हवणे,बसस्थानक प्रमुख रमेश सोनवणे,वासुदेव आव्हाड यांच्या सह एस.टी च्या चालक वाहक यांत्रिक कामगारांनी दिंडीचे तोफांची सलामी देत गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे स्वागत केले.उपस्थित एस.टी. च्या अधिकाऱ्यांनी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा केली.

यावेळी राज्यातील पहिल्या रिंगण सोहळयास “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात सुरुवात झाली.सर्वप्रथम वारकऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले त्यानंतर झेंडेकरी पथकाचे रिंगण व घोड्यांचे अश्व रिंगण झाले. यावेळी सादर झाले सदरच्या झालेल्या रिंगणाने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.यावेळी बदामबाई विद्यालयातील विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले.शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या शिवभक्त सारंगधर पाटील पानकडे यांनी गुरुवर्य भास्करगिरी बाबांना मानाचा मुजरा केला.नेवासा आगाराच्या वतीने गुरुवर्य बाबांचे संतपूजन करण्यात आले.तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे,प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ.सुनिताताई गडाख, शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितिज घुले,गटविकास अधिकारी सुधाकरराव मुंढे, नायब तहसीलदार नारायण कोरडे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, विक्रम चौधरी, माजी आगार व्यवस्थापक सुरेश देवकर, अध्यक्ष दत्तात्रय बर्डे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी, तालुका विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महेश मापारी, तलाठी संघाचे सोपान गायकवाड, बद्री कमानदार, बबनराव वरघुडे, पोलीस पाटील संघटनेचे रंगनाथ पवार आदींनी गुरुवर्य बाबांचे हार घालून स्वागत केले.

यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी बाबा म्हणाले की भरपूर पाऊस पडू वृक्षवल्ली फुलू दे,नद्या ओढे नाले खळखळून वाहू दे, बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी विठुरायाच्या चरणी केली. शेतकऱ्यांना बळी राजा म्हटले जाते पण त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे कर्जमाफी नको मात्र त्यांना वीज आणि फुकट दया असे त्यांनी आपली भावना बोलून दाखविली. यावेळी कामगार नेते सर्व पक्षाचे नगरसेवक विविध संस्थेचे पदाधिकारी व सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर रमेश सोनवणे यांनी आभार मानले.

देवगड दिंडी ग्रामप्रदक्षिणासाठी नेवासा नगरीत गेली असता खोलेश्वर मंदिर चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने रम्हूभाई पठाण,जातीय सलोखा समितीचे सदस्य असिफभाई पठाण यांनी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे हार घालून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.नगरपंचायत चौकात उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्व नगरसेवकांनी दिंडीचे स्वागत करून सत्कार केला.

येथील संभाजी चौकात मुथ्था परिवाराच्या दिलीप मुथ्था व रविंद्र मुथ्था यांच्या वतीने दिंडीला चहापान व अल्पोपहार देण्यात आला.औदुंबर चौकात चालक मालक संघटनेच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले.दुर्गादेवी मंदिरात गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी दर्शन घेतले यावेळी पुजारी सुभाष चव्हाण व दुर्गादेवी तरुण मंडळाचे अजय पठाडे यांच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्कामास गेली असता येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज यांनी संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे संतपूजन केले.यावेळी महाआरती होऊन उपस्थित वारकरी बांधवांना शिंगी परिवाराच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.

राज्य शासनाची ‘संवाद वारी’ पंढरीच्या दारी ; शनिवारी पुण्यातून प्रारंभ

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीचे पुण्यात आगमन

वारक-यांनी दिली महेश लांडगे यांच्या कामाची पावती