बॉलिवूडकरांनाही ‘स्माईल प्लीज’ची भुरळ

टीम महाराष्ट्र देशा- नुकतेच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने ‘विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर लाँच केले. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता बॉलिवूडला सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक कारण जोहर यांनी ‘स्माईल प्लीज’चा टीझर सोशल मीडियावर लाँच केले आहे. त्यामुळे ‘स्माईल प्लीज’ने बॉलिवूडकरांनाही भुरळ घातल्याचे दिसत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या मुक्ताच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडायला लागतात ज्यामुळे तिचे आयुष्य बदलू लागते. याच वळणावर तिच्या आयुष्यात नवीन उमेद बनून येतो तो ललित प्रभाकर.

Loading...

”जगात इतकं मोठं काहीच नाही, की ज्याच्यासमोर आपण हार मानावी”, असा प्रेरणादायी सल्ला देत, तिला प्रतिकूल परिस्थिती तो साथ देत आहे. तर दुसरीकडे प्रसाद ओक जितका हळवा तितकाच तापटही दिसत आहे. जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तृप्ती खामकर, सतीश आळेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट निश्चितच जगण्याचा नवा दृष्टिकोन देणारा आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल