राम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल

टीम महारष्ट्र देशा : स्वयंघोषित गुरु राम रहीम आणि अन्य तिघांना पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसेच  प्रत्येकी ५० हजारांच्या दंड देखील ठोकला आहे.

पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ११ जानेवारी रोजी राम रहिम आणि त्याच्या तीन साथीदारांना रामचंद्र यांच्या हत्ये प्रकरणी कलम ३०२ आणि १२० अंतर्गत हत्या आणि हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. आज या दोषींना सीबीआयच्या विशेष न्यायालायाने शिक्षा सुनावली आहे.

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरण १६ वर्ष जुने असून. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. छत्रपती सतत त्यांच्या वृत्तपत्रातून डेरा सच्चा सौदा आणि त्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. यामुळे त्यांनी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास नोव्हेंबर २००३ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. २००७ मध्ये सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. यात राम रहीम मुख्य आरोपी होता.

1 Comment

Click here to post a comment