शिवसेनेचा “चला सत्ता सोडू या” कार्यक्रम जोरात – राधाकृष्ण विखे पाटील

radha krushn vikhe patil leader of opposition

टीम महाराष्ट्र देशा –  राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘घोटाळेबाज भाजपा’ नावाची पुस्तिका वितरित करून भाजपा वर अत्यंत गंभीर आरोप केलेत.मात्र शिवसेनेची हि निव्वळ स्टंटबाजी असुन शिवसेनेने केवळ देखावा न करता, या घोटाळेबाज सरकारमधून बाहेर पडून दाखवावं तरच शिवसेनेच्या या आरोपात काही अर्थ आहे असं म्हणता येईल.

शिवसेनेचं दुटप्पी वागणं लोकांच्या लक्षात येतय.चला हवा येऊ द्या या हास्य कार्यक्रमप्रमाणे शिवसेनेचा मातोश्री production निर्मित चला सत्ता सोडू या हा कार्यक्रम सुरू असल्याचे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली.