मराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले ?

Section 144 applies to Chakan

पुणे: मराठा आरक्षण आंदोलनावेळी काल चाकणमध्ये मोठा हिंसाचार झाला, यामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, हा हिंसाचार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यानी नाही, तर बाहेरून आलेल्या जमावाने केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी सोमवारी चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, या बंद दरम्यान अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. एसटी बसला आग लावण्यात आली तर दगडफेकीची घटना देखील घडली होती. या सर्व घटना पाहता शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.

दरम्यान, तोडफोड आणि हिंसाचाराप्रकरणी तब्बल चार ते पाच हजार लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.