fbpx

भारताला दहशतवादा विरुद्ध लढाईसाठी आमचा पूर्ण पाठिंबा असणार – अमेरिका

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक देशांकडून या घृणास्पद कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर आता अमेरिकेने भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा भारताला पाठिंबा असल्याच सांगितल आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी या झालेल्या घटने संदर्भात फोनवर चर्चा केली. त्यावेळी दहशतवाद्यांच्या या कृत्याचा अमेरिके कडून तीव्र निषेध करण्यात आला.

दरम्यान अमेरिकेचा भारताला या दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी पाठिंबा असणार आहे असे देखील जॉन बोल्टन यांनी डोवल यांना सांगितले. तसेच जॉन बोल्टन पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा असे आम्ही आधीच पाकिस्तानला स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताला स्वतःचे रक्षण करण्याचे पूर्ण अधिकार आहेत तर अमेरिका देखील या दहशतवादी लढयाविरुद्ध भारताला पाठींबा देणार आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर व्हाइट हाऊस मध्ये निषेध व्यक्त केला. तर व्हाइट हाऊसमधून देखील पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवाद्यांना आपल्या देशात कारवायांसाठी मोकळीक देणे तसेच या कारवायांना पाठींबा देणे वेळीच थांबवा असा इशारा पाकिस्तानला व्हाइट हाऊस मधून देण्यात आला आहे.