शेतकऱ्यांनी बंद पाडला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा साखर कारखाना

shubhash deshmukh and sugar factory

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठी सुरु असलेले आंदोलन पेटल आहे. कारण जनहित शेतकरी संघटनेकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा लोकमंगल साखर कारखाना बंद पाडण्यात आला आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्या समोर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र सहकारमंत्र्यानकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने आज आंदोलक अचानक आक्रमक झाले आहेत. ते कारखान्याच्या गव्हाणीत घुसले त्यामुळे ऊस गाळपाच काम बंद करण्यात आल आहे.