मुख्यमंत्र्यांच्या शोक संदेशाच्या झाल्या शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून एक पत्र पाठवण्यात आले. शुभेच्छांनी सुरुवात झालेल्या या शोकसंदेशाच्या पत्राचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मुख्यमंत्र्यांवर सोशल मिडीयामध्ये टीका होत होती मात्र हा सगळा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचं समोर आलं आहे.मूळ पत्रामध्ये शुभेच्छा हा संदेश नसल्याचं राजेश संभाजी पवार यांच्या फेसबुक पोस्टवरून स्पष्ट झालं आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा सध्या शोध घेतला जात आहे.

shubhechaa

राजेश संभाजी पवार यांची फेसबुक पोस्ट

 

राजेश संभाजी पवार यांची फेसबुक पोस्टची लिंक https://www.facebook.com/RajeshSambhajiPawar/posts/2031826257050632