रामजन्माचा मुद्दा संपल्याने सीएए,एनआरसीवर भाजपचा जोर- आनंदराज आंबेडकर

blank
औरंगाबाद : “भाजपने आलेल्या आमचा सीएए, एनआरसीला कडाडून विरोध आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजकडून सीएए , एनआरसीचा मुद्यावर जोर दिला जात आहेत. भाजपकडून सध्या धर्मा-धर्मावरुन भेदाचे राजकारण केले जात असल्याची टिका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिना निमित्ताने आनंदराज आंबेडकर औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजपकडून सीएए, एनआरसी पुढे केली जात आहे. मात्र आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. यांना कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे. यातून किती बेरोजगार आहे, त्यांची वेगळी माहिती मिळेल. मात्र हे सर्व सोडून केंद्राकडून भेदाभेदाचे राजकारण सुरु आहे.

सीएए आणण्याची काय गरज होती ? पाकीस्तान, बांग्लादेशातून आलेल्या 34 हजार लोकांना अगोदरच नागरीकत्व देण्यात आले आहे. मात्र एका धर्माला वगळून त्यांना इतरांना मॅसेज पाठवायचा आहे. यातून राजकीय उद्देश साध्य करणे अतिशय दुर्देवी आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन समता, बंधुत्व, संविधानावर चालले पाहिजे.

नामविस्ताराची लढाई त्यागावर उभी राहिली

नामविस्तार दिनाला 25 वर्ष होत आहे. ज्यांना यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. सर्व त्यागून लढ्यात आयुष्याची राख-रांगोळी केली. ज्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी त्याग केला त्यांचे मनावर पासून धन्यवाद.ही लढाई त्यागावर उभी राहिली. जेथे अन्याय होतो तेथे लोकांच्या हातात आंबेडकरांचे आणि संविधानाच्या प्रतीचे छायाचित्र असते. जेएनयु, जामिया मध्ये आपण हे बघितले. इतकेच नव्हे तर विरोधकांच्या हातात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.