जाऊ दे न वं… ‘चैत्या’ सध्या व्यस्त आहे ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘नाळ’ चित्रपटातील जाऊ दे न वं… या गाण्याने आख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. तसेच अजून सुद्धा जाऊ दे न वं… हे गाणं लहान मुलांच्या तोंडून येत आहे. तसेच ‘नाळ’ चित्रपटात ‘चैत्या’ने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजून आहे.

तसेच ‘नाळ’ चित्रपटानंतर श्रीनिवासने राजकुमार आणि सुधाकर रेड्डी जॉर्ज रेड्डी नावाचा एक तेलुगु चित्रपट केला आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यात त्याने मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारली आहे.

श्रीनिवास तेलगु चित्रपट ‘जॉर्ज रेड्डी’ या चित्रपटात दिसणार आहे. मागील वर्षी १६ नोव्हेंबरला ‘नाळ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने व त्यातील जाऊ दे नवं या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

श्रीनिवास पोकळे मूळचा अमरावतीचा असून तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे. ‘जॉर्ज रेड्डी’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. तसेच चैत्या पुन्हा एकदा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना याड लावणार का ? हे लवकरच सिद्ध होईल.

महत्वाच्या बातम्या