जर तू इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही, तर…

पुणे : ‘जर तू इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोल्यात ये तुला कापून टाकतो, अशी धमकी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाईंना अकोले तालुक्यातील भोर येथील सोमनाथ महाराजांनी दिली आहे. याबाबत हे असं करायला इंदोरीकर महाराजच सांगत असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.

तृप्ती देसाईनी आलेल्या फोनकॉलबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. ‘किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत आहे. पण काल (21 फेब्रुवारी) मी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला.

Loading...

त्यावर समोरुन “मी सोमनाथ महाराज भोर, अकोले तालुक्यातून बोलत आहे, असे सांगण्यात आले. तुम्ही तृप्ती देसाई बोलताय का, असा प्रश्न विचारल्यानंतर मी हो म्हणून उत्तर दिले. त्यानंतर तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्याशिवाय त्यांनि अश्लील भाषेत शिवीगाळही केली,” असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, मला कापून टाकण्याची भाषा करणाऱ्या या महाराजांकडून माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. तसेच इंदोरीकरांचे समर्थक त्यांच्या सांगण्यावरून मला धमक्या देत आहेत, असे तयी यावेळी सांगितले आहे. याबाबत त्यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश