सोलापुर तुळजापुर उस्मानाबाद रेल्वे मार्गासंदर्भात अधिकाऱ्यांची खा.निंबाळकरांनी घेतली आढावा बैठक

blank

तुळजापूर- सोलापुर उस्मानाबाद रेल्वे मार्गाची रेल्वे अधिकारी व महसुल अधिकारी यांची खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतली संयुक्त बैठक व रेल्वे मार्गावरील प्रस्तावित स्थानकाच्या स्पॉटची तुळजापुर,उस्मानाबाद येथे शहरवासीयांसाठी होणाऱ्या सांजा,उस्मानाबाद रेल्वे टेशन जवळील जुन्या ट्रकला नवीन ट्रक जोडणाऱ्या स्पॉटची संयुक्त पाहणी खासदारांनी केली.

उस्मानाबाद सोलापुर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास महिना भरातच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूसंपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी महसुल आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाऊन सुचना दिल्या तसेच ज्याठिकाणी शेतरस्ते आहेत शेतकरी बांधवांना अडचण होऊ नये यासाठी अंडरपास सोडण्याच्या सुचना दिल्या. हा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी निधि असेल किंवा ज्या ज्या अडचणी येथील त्या मी पाठपुरावा करून सोडविण्याचे खासदारांनी अधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

याप्रसंगी रघूनंदन गुप्ता (डेप्युटी जीफ इंजिनियर पुणे), डी के श्रीनिवास (सेक्शन इंजिनियर पुणे), नुर सलफान (सेक्शन इंजिनिअर सोलापुर), चेतन गिरासे (उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद),सौ बाफना(उपविभागीय अधिकारी तुळजापुर),शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,संजय निंबाळकर,उस्मानाबाद तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,शहरप्रमुख पप्पु मुंडे आदि उपस्थित होते.