करमाळ्यात संजय शिंदे यांचा झंझावात कोण रोखणार ?

कुर्डूवाडी/प्रतिनीधी – हर्षल बागल : करमाळा विधानसभा मतदार संघात दररोज होणाऱ्या विकास निधीचे वाटप आणी रोज होणाऱ्या गर्दीच्या जाहिर सभा , जिल्हा परिषद च्या विविध फंडातुन करमाळा मतदार संघात मिशन करमाळा समोर ठेवत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन संजय शिंदे यांनी आपले पाय विधानसभा मतदार संघात मजबुत केले आहेत. त्यामुळे सुसाट सुटलेला संजय मामांचा झंझावती रथ कोण रोखणार अशी चर्चा करमाळा तालुक्यात होत आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला

2019 च्या दिशेने पाऊले टाकत संजय शिंदे यांच्याकडून लाखो रुपयांचा निधी दिला जात आहे. आठ दिवसातून एका विकासकामाचे ऊद्घाटन समारंभ होत आहे. तसं पाहिले तर करमाळा तालुक्यात नवख्या नेत्याला जम बसवणे कठिणच आहे . पण संजय शिंदे यांनी अवघ्या चार वर्षात करमाळा तालुक्यात आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल यांना भविष्यात संजय शिंदे यांचा हा सुसाट चाललेला झंझावत अडचणीत आणु शकतो.

रश्मी बागल यांच्याकडे कोणतेही सत्तास्थान नाही केवळ दोन सहकारी साखरकारखाने यावरच त्यांची मदार अवलंबुन आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित रश्मी बागल यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आत्ता समोर कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक तोडांवर आली आहे. संजय शिंदे यांनी त्या दिशेने पाऊले टाकत ज्या गावात कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सर्वाधिक मतदान आहे त्या गावांना लाखो रुपयांची निधी देण्यास सुरवात केली आहे.

आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.

करमाळा मतदार संघाबरोबरच माढ्यातुन करमाळ्याला जोडलेली 36 गावे यामध्ये देखील मागिल महिन्यापासुन विशेष लक्ष घालित निधी देऊन नाराजी दुर करत असताना दिसत आहेत. 36 गावावंर शिंदे गटाचेच वर्चस्व कायम राहिले असले तरी मध्यंतरीच्या काळात काही गट नाराज दिसुन आले. हे लक्षात घेता संजय शिंदे यांनी 36 गावात निधी वाटपासाठी जिल्हा परिषद सदस्य व पचांयत समिती सदस्य तसेच गावोगावचे सरपंच यांना गावागावात जाऊन सर्व्हे करुन कोठे किती निधी द्यायचा यावर विशेष बैठका घेण्यास आदेश दिले आहेत. या बैठकांना देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याने 36 गावे पुन्हा शिंदे गटाच्या पारड्यातच 2019 ला जाऊ शकतात असाही अंदाज लावला जात आहे.

माढा लोकसभेचे खा. विजयसिंह मोहिते पाटिल आणी संजय शिंदे यांचे हाडवैर राज्याला माहित आहे. संजय मामा शिंदे यांना रोखण्यासाठी मोहिते पाटिल आगामी काळात रश्मी बागल यांना साथ देणार की पुन्हा माघील निवडणुकीप्रमाणे शिवसेनेच्या नारायण पाटील यांना पाठिंबा देणार यावर देखील 2019 चे पारडे फिरु शकते. राष्ट्रवादीनेच रश्मी बागल यांचा पराभव गतनिवडणुकित केला असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. अपक्ष ऊमेदवार असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचा झंझावत आगामी 2019 पर्यंत चालु राहीला तर 2019 मिशन करमाळा हे शिंदे गटासाठी लाभदायक नक्कीच ठरेल.

पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे 

2014 च्या निवडणुकित संजय शिंदे यांनी करमाळ्यात अपक्ष विधानसभा लढवली. निवडणुकिला दोन महिने वेळ मिळाल्यानंतर संजय शिंदे यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. अनेक गावात संजय शिंदे यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही. पण ज्या गावात सहा मते पडली त्याच गावात संजयमामा शिंदे यांनी आठवड्यात लाखो रुपयांचा निधी दिला . त्यामुळे संजय शिंदे यांच्याकडे करमाळा तालुक्यात गर्दी वाढत असल्याने बागल व पाटिल यांना या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम झेलावा लागणार आहे. करमाळ्यात बागल , पाटिल , शिंदे यांच्यात सध्या राजकिय अस्तित्वाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे जो तो विविध फंडातुन निधी देण्यासाठी धावपळ करित आहे. बागल- पाटिल -शिंदे यांच्या राजकिय वादात करमाळ्याची मात्र चांदी होताना दिसत आहे.

सुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान ?

छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे