राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार,राजू शेट्टी आक्रमक

raju-shetty

लातूर: लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे वीज वितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत.

महिन्याला साधारणतः 500 ते 700 रुपये बिल येणाऱ्या लोकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लगतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडलाय.

भाजपने याविरोधात एल्गार पुकारला असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार 13 जुलै रोजी राज्यभर वीज बिलांची होळी करण्याचे आंदोलनाचे अस्त्र संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी उपसले आहे.हिदुस्तान समाचारने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

कोरोनामुळे जनता झाली त्रस्त, त्यात वीज बिले आली जास्त, जनतेने काढले आंदोलनाचे अस्त्र, महावितरण मात्र दरवाढ करून झाले सुस्त राज्य शासनाने घरगुती वीज बिलाची रक्कम महावितरणला देऊन वीज ग्राहकांचे तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन प्रा. एन डी पाटील, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे.

राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क बांधून, आरोग्य सेतू ॲप नियमाचे पालन करीत राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील, महावितरण व ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयासमोर आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

सरकारने नाही तर RSS च्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घातला होता – चंद्रकांत पाटील