इंदुरीकरांचे कीर्तन होणार म्हणजे होणार : डॉ. प्रविण कोडोलीकर

पुणे : कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. मात्र या किर्तनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदारपणे विरोध केला. इंदुरीकर यांचे किर्तन रद्द करा. त्यांचे विचार घाणेरडे आहेत. त्यांना विद्यापिठात येऊ देऊ नका’, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कुलगुरूंकडे केली होती. तसेच हा कार्यक्रम झाल्यास त्यांचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही दिला होता.

तर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कार्यक्रम रद्द झालेला नाही तर ते वेळेत पोहचत नसल्याने स्थगित करण्यात आला आहे. दोन महिन्यांनी त्यांचे किर्तन होणार म्हणजे होणार. त्यावेळी कोणीही विरोध केला तरी जुमानणार नाही, असे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी दिली आहे. तर ‘जोवर वाद मिटत नाही तोवर येणार नाही.’अशी भूमिका इंदोरीकर यांनी घेतली. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यामुळे किर्तन रद्द करण्याची वेळ आयोजकंवर आली.

Loading...

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदोरीकर यांच्या किर्तनाला पाठिंबा दिला. त्यामुळे दोन संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. अंनिस आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी हा कार्यक्रम उधळून लावल्यास जशास तसे उत्तर देऊ असेही सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, किर्तनाला विरोध करणारे फक्त चार पाच लोक होते. त्यांना घाबरून कार्यक्रम रद्द केला असे नाही. स्टंटबाजी करणाऱ्या लोकांना घाबरलो तर समाजात चांगल्या गोष्टी होणार नाहीत. अंनिसच्या लोकांनी वाद सुरू केला आणि वाद मिरवायला वेळ लावला. इंदोरीकर यांना आमचे किर्तन झाल्यावर सांगली जिल्ह्यात किर्तनाला जायचे होते. तिकडे दिलेल्या वेळेत ते पोहोचू शकणार नाहीत म्हणून आमचा कार्यक्रम आम्ही स्थगित केला, असे डॉ. कोडोलीकर म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा