तर इंदुरीकारांचा कार्यक्रम उधळून लावू, पुरोगामी संघटनांचा इशारा

कोल्हापूर : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. या बेताल वक्तव्याने इंदुरीकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. इंदुरीकर यांच्या बेताल वक्तव्याने त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इंदुरीकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर कोल्हापुरातील पुरोगामी विचारांच्या महिला संघटनांनी विद्यापिठात होणारा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे. त्यामुळे महिलांबाबत बेताल बोलणाऱ्या इंदुरीकर यांचा कार्यक्रम या विद्यापीठात होऊ नये, अशी भूमिका या महिला संघटनांनी घेतली असून इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

Loading...

तर कोल्हापूर युवा सेनेनं या संघटना विरोध करत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना त्या’ व्हिडिओबाबतचे पुरावे दिले आहेत.मात्र पुरावे देऊनही १५ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास इंदोरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध फिर्याद दाखल करू, असा इशारा अंनिसच्या राज्य कार्यवाह ऍड. रंजना गवांदे यांनी आज दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती