आता ‘यां’नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट

मुंबई : ”आम्ही आमची कागदपत्रे कुठून आणणार? आमच्या मुलांचे वडील म्हणून कुणाचे नाव देणार? आमच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे सरकारने NRC कायदा आणू नये,’ अशी मागणी वेश्याव्यवसायातील महिलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसंच या मागणीला पाठिंबा मिळण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

केंद्र सरकार आणू पाहात असलेल्या CAA आणि NRC कायद्याला देशभरातील अनेक समूह विरोध करत आहेत. तसेच या कायद्यांच्या विरोधात देशभरात अद्यापही कुठे ना कुठे मोर्चे निघत आहेत. आंदोलनं होत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही NRC लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

Loading...

मुंबईमध्ये सुद्धा CAA, NRC आणि NRP ला विरोध करण्यासाठी सर्व धर्मीयांनी शनिवारी तीव्र विराट मोर्चा काढला होता. आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला. जवळपास 67 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. यामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. मोर्चामध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले. मात्र या मोर्चामधील महिलांची संख्या लक्षणीय होती. नो सीएए, नो एनआरसी आणि नो एनपीआरच्या घोषणा देण्यात आल्या. तर ‘संविधान बचाव देश बचाव’च्या घोषणांनीही आझाद मैदान आंदोलकांनी दणाणून सोडलं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती