मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती

नवी दिल्ली- देशातील जनतेला मोदी सरकारनं काळ्या पैशावर गप्प का आहे, हे जाणून घ्यायचं आहे. भाजपाही अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण स्विस बँकेत ज्यांचे पैसे आहेत त्या लोकांची भाजपाशी जवळीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाजपा हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयास आला असल्याची बोचरी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.

मोदींनी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. विकासाच्या मुद्दा उपस्थित करून सत्तेवर आलेल्या भाजपानं नंतर स्वतःच्या मूळ विचारधारेनुसार जातीय द्वेषाचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्तींचा पाठिंबा काढून घेतला होता अशी देखील टीका त्यांनी केली.

…म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत – रामदास आठवले

भाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल

You might also like
Comments
Loading...