स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

पुणे : दुधाला पाच रूपये दर देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन छेडण्यात आले आहे, तसेच मुंबईला होणारा दूध पुरवठा हा मागील दोन दिवसांपासून रोखण्यात आला आहे, दरम्यान, आता पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या प्रमुखांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी हडपसर येथे दुधाची गाडी फोडण्यात आली होती याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे

शहरांना दुध आंदोलनाची झळ ; उद्यापासून पुण्यात चितळेही बंद ?