एनपीए वाढण्यास काँग्रेस जबाबदार : रघुराम राजन

raghuram-rajan

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावर संसदीय समितीने एनपीएबाबत पाठविलेल्या उत्तरात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एनपीए वाढण्यात तत्कालीन युपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

रघुराम राजन यांनी देशातील बँकांच्या बुडीत कर्जाबाबत मोठं विधान केलं आहे. घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब आणि लांबलेल्या निर्णयांमुळे बँकांचं बुडीत कर्ज अर्थात एनपीए वाढत गेला, असं राजन यांनी म्हटलं.