शेतकऱ्याची देण्याची दानत धर्मा पाटलांनी जाता जाता सुद्धा दाखवली

शेतकरी कितीही दुखा:त अडचणीत असो तरीही त्यांच्या दारात कोणी आल्यास तो रिकाम्या हाताने परतत नाही. आज याचच मूर्तिमंत उदाहरण धर्मा पाटील यांच्यामुळे घडल आहे. औष्णिक विद्युत केंद्रासाठी सरकारने धर्मा पाटील यांच्या चार एकर बागायती शेतीच अधिग्रहण केल होत. मात्र गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या सरकारी यंत्रणेन त्यांना केवळ ४ लाखांची भरपाई दिली होती. याच अन्याया विरोधात धर्मा पाटील यांनी गावातील अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र तरीही न्याय मिळत नसल्यान त्यांनी मंत्रालयातच विष प्रशान केले. आज उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

धर्मा पाटील यांनी जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्ती हे जग पाहू शकणार आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने जे. जे रुग्णालयाला अर्जाद्वारे नेत्रदानाची संमती दिली होती. मृत पाटील यांच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे डोळे हे जग पाहू शकणार आहेत. dharma patil netrdan

सरकारी अनास्थेने घेतला धर्मा पाटील यांचा जीव

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पामध्ये गेली. त्यांनी या जमिनीसाठी 4 लाख रुपये मोबदला देण्यात आला. परंतु, त्यांच्या शेतातील आंब्या झाडांचे मूल्यमापन किंवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतीला अधिक मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे 28 जानेवारी रोजी मुंबईत निधन झाले.

You might also like
Comments
Loading...