स्व. बाळासाहेबांनी शाळेत असतानाच शिवसेना पक्ष काढला होता का ?, निलेश राणेंचा राऊतांना सवाल

blank

मुंबई : भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

वो हमारा मैप बिगाड़ेंगे, हम उनके ऐप उखाड़ेंगे; वाह मोदीजी वाह !!

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान भारतात टिक-टॉक लाखो चाहते आहेत. या चाहत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

भारत सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते आणी खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपवर आसूड ओढले आहेत. ‘चिनी अ‍ॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी माहिती होते तर या कंपन्या का सुरु होत्या? आमच्या वीस जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरु राहिल्या असत्या’, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

‘चिनी अ‍ॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये’, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. ‘चीनचे आर्थिक कंबरडे मोडावे ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूतीबाबतही आर्थिक धोरण ठरवले पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये’, असंदेखील संजय राऊत म्हणाले.

वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

संजय राऊत यांच्या याच विधानावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी raut यांच्यावर जोरदार प्रहर केला आहे. ‘स्व. बाळासाहेबांनी शाळेत असतानाच शिवसेना पक्ष काढला होता का ? परिस्थिती आली त्यानंतरच त्यांना शिवसेना काढावीशी वाटली ना. संज्या तू किती बावळट आहेस याची अजून उदाहरणे देऊ नकोस सगळ्यांना बऱ्यापैकी कळलेलं आहे’. अस ट्विट करत निलेश राणे यांनी अतिशय आक्रमक भाषेत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.