देशाला तुझी गरज आहे, निवृत्तीचा विचार देखील करू नकोस ; लतादीदी गहिवरल्या

टीम महाराष्ट्र देशा- वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली आहे. 38 वर्षीय धोनीचा हा कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्ड कप असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

सोशल मिडीयावर सुरु असलेल्या या चर्चांनी अस्वस्थ झालेल्या जेष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी धोनी संदर्भात ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. लतादीदी या ट्वीट मध्ये म्हणतात…’धोनीच्या निवृत्ती संदर्भात मला काही चर्चा ऐकायला आल्या आहेत. ज्यात तुम्ही निवृत्त होऊ इच्छिता असं ऐकायला मिळत आहे. कृपा करून असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची आवश्यकता आहे. मी तुम्हाला विनंती करते की निवृत्तीचा कोणताही विचार तुम्ही करू नका’.

दरम्यान,महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही धोनीच्या निवृत्तीवर स्पष्ट मत मांडले आहे. धोनीच्या निवृत्तीवर तेंडुलकर म्हणाला,” तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. त्याला निर्णय घेण्याची प्रत्येकाने मोकळीक द्यायला हवी आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं दिलेल्या योगदानाचा आदर करायला हवा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबवा. देशासाठी इतकं योगदान दिल्यानंतर त्याला त्याचा निर्णय घेऊ द्या.”Loading…


Loading…

Loading...