‘आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!’; राज ठाकरेंकडून लतादीदींनी शुभेच्छा

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावरून राज ठाकरे यांनी लतादीदींसाठी स्वत: काढलेले शुभेच्छाचित्र प्रसिद्ध केले. या शुभेच्छाचित्रात वर मोठ्या अक्षरात अभिष्टचिंतन असेही लिहिले आहे. चित्रात लतादीदी वीणा वाजवताना दिसत असून ‘आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.