‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले

मुंबई- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं ‘लस्ट स्टोरीज’ सिनेमात हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे अश्लील कृत्य केल्याबद्दल त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चांगलीच कानउघाडणी केली आहे.’वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करचा हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच ‘लस्ट स्टोरीज’मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्यानं खळबळ उडवून दिली आहे.

जोया अख्तर, करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांनी चार स्त्रियांच्या कथा या वेब सीरिजमध्ये मांडल्या असून ही वेबसीरिज १५ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा आणि कामुकता याविषयी भाष्य करण्यात आले असून यात राधिका आपटे, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. या सीरिजमध्ये स्त्रियांच्या कामुकतेसंदर्भातील एका दृश्याचे चित्रिकरण करत असताना ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील टायटल सॉगचा वापर करण्यात आला आहे.

Loading...

नेमकं काय म्हणणे आहे मंगेशकर कुटुंबियांचे ?

‘आक्षेपार्ह आणि लज्जास्पद दृश्यांसाठी लता मंगेशकर यांच्या आयकॉनिक गाण्याचा वापर का केलात’? ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाठी टायटल सॉंगचे रेकॉर्डिंग होत असताना करणच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकून येत होता. मात्र त्याने या वेबसीरिजसाठी याच गाण्याचा वापर कसा काय केला हे काही समजतं नाही. या दृश्यासाठी तो दुस-या एखाद्या गाण्याचीही निवड करु शकला असता. लता मंगेशकर यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं अजिबात वागू नका. या गाण्याच्या वापरामुळे लताजी यांनी आजपर्यंत जे नाव कमावलं आहे ते धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दृश्यातून आणि या वेबसीरिजमधून लवकरात लवकर हे गाणं काढून टाकावं’.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'