…अखेर औरंगाबादला मिळाले नवीन पोलीस आयुक्त

chiranjiv prasad

औरंगाबाद: औरंगाबादचे पोलीस आयुक्तपदी नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला तात्काळ पोलीस आयुक्त द्या, अशी मागणी करण्यात होती.

औरंगाबाद शहरात जानेवारीपासून आतापर्यंत चार दंगली झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवरील लुटमार, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ आहे. नवीन पोलीस आयुक्त मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांना थोडा धीर मिळाला आहे.

चिरंजीव प्रसाद यांनी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी २००२ मध्ये काम केले आहे. तसेच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातही त्यांनी कामगिरी केली आहे. प्रसाद हे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून छत्तीसगडमध्ये राबविण्यात आलेल्या अॅॅन्टी नक्षल आॅपरेशनचे ते प्रमुख होते.