गेल्या आठवड्यात ४ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी दिली विद्यापीठाची परिक्षा

Graduation classes at the university will begin on February 15

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ४ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी परिक्षेस उपस्थिती नोंदविली. तर वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवार पेपरला सुट्टी देण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा सात एप्रिलपासून सुरळीत सुरु झाल्या. परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षा केंद्रावर ‘कोविंड संदर्भात योम्प ती उपाययोजना‘ व फिजीकल डिस्टिन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्याची सूचना दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

१६ मार्चपासून सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ लाख २७ हजार १८७ परीक्षार्थी आहेत. तर ७ एप्रिल रोजी सुरु झालेल्या बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षेस एकुण ७६ हजार ४९० विद्यार्थी आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होऊन २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. या काळात विविध अभ्यासक्रमांचे २ लाख १८ हजार ६२० विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देत आहेत. २५० महाविद्यालये होम सेंटर आहेत. मंगळवारी (दि. ६) १ लाख ३६ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर बुधवारी (दि.७) एकुण १ लाख ७० हजार ३७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ८ एप्रिल रोजी एकूण ६० हजार १४१ जणांनी परीक्षा दिली.

शुक्रवारी एकुण ७८ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या मध्ये ५९ हजार ९९ जणांनी ऑफलाईन पद्धतीने २५० केंद्रावर परीक्षा दिली. तर १९ हजार ७२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवार पेपरला सुट्टी आहे. तर चार दिवसात मिळून ४ लाख ४५ हजार ८९४ जणांनी परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या