SBI च्या ‘या’ खास योजनेत गुंतवणुक करण्याची शेवटची संधी; जाणून घ्या.

SBI

नवी दिल्ली:  स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने  ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आले होते.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त विशेष ठेव योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेली ही योजना आज म्हणजेच 14 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे. एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळू शकतो. तसेच  बँकेचे ग्राहक मुदत ठेवींवर 15 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळवू शकता.

प्लॅटिनम डिपॉझिट योजना- 75 दिवस सध्याचा दर- 3.90 टक्के प्रस्तावित दर- 3.95 टक्के, 525 दिवस सध्याचा दर- 5 टक्के प्रस्तावित दर- 5.10 टक्क, 2250 दिवस सध्याचा दर- 5.40 टक्के
प्रस्तावित दर- 5.55 टक्के.

तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 दिवसांची प्लॅटिनम डिपॉझिट योजना- सध्याचा दर- 4.40 टक्के, प्रस्तावित दर- 4.45 टक्के, 525दिवस सध्याचा दर- 5.50 टक्के प्रस्तावित दर- 5.60 टक्के, 2250 दिवसया कालावधीसाठी ठेवीवर 6.20 टक्के व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या