fbpx

गेली 50 वर्ष काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवलं आहे : फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा- काही देशांमध्ये आज एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो, मात्र गेली 50 वर्ष काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवलं आहे, आता लोकांना तुम्ही एप्रिल फूल बनवू शकत नाही. असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी वर्धा येथील सभेत बोलताना केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.आपल्या भाषणातून फडणवीसांनी विरोधी पक्षांची अक्षरशः पिसे काढली.

यावेळी येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भातील १० पैकी १० जागा भाजप- शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच विदर्भातून काँग्रेस- राष्ट्रवादीचा सुफडा साफ होईल, असा दावा त्यांनी केला.