गुरु नानक यांनीच इस्लामची बदनामी करण्याचा कट रचला : अब्दुल रहमान मक्की

टीम महाराष्ट्र देशा- इस्लामची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या अनेक शतकांपासून सुरु आहे. शीखांचे पहिले गुरु गुरु नानक हे सुद्धा या कारस्थानामध्ये सहभागी होते ते सुद्धा इस्लामची बदनामी करण्यामध्ये समान गुन्हेगार आहेत असं खळबळजनक विधान पाकिस्तानातील लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा नेता अब्दुल रहमान मक्कीने केलं आहे. हे विधान करून मक्कीने शीखांचे पहिले गुरु गुरु नानक देव यांचा अपमान केला असून शिखांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. पाकिस्तानातील मुल्तान शहरात एका कार्यक्रमात बोलताना त्याने ही मुक्ताफळे उधळली.

guru_nanak_devji

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

गुरु नानक देव हे भारतासह जगभरातील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान आहेत. गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. मक्की भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आहे तसेच लष्कर-ए-तोयबामध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे.

नेमकं काय म्हणाला मक्की

शीख बेईमान, घोटाळेबाज आणि इस्लामविरोधी असून इस्लामची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या अनेक शतकांपासून सुरु आहे. शीखांचे पहिले गुरु गुरु नानक हे सुद्धा या कारस्थानामध्ये सहभागी होते ते सुद्धा इस्लामची बदनामी करण्यामध्ये समान गुन्हेगार आहेत .३५० वर्षांपूर्वी हिंदुंनी इस्लामविरोधात अत्यंत वाईट मुस्लिमांना कमकुवत करण्याचा कट रचला. गुरु नानकचं या कटाचे सूत्रधार होते

Shivjal