VIDEO : अमेरिकेतील लास वेगास मध्ये अंधाधुंद गोळीबार

लास वेगास : अमेरिकेतील लास वेगास शहरात अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाली आहेत तर 12 जणांची प्रकृती गंभीर आहे.

स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला.

मॅकरेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानं वळवण्यात आली आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

Rohan Deshmukh

Latur Advt
You might also like
Comments
Loading...