‘कोविड सेंटरमधील जेवणात अळ्या, ठेकेदार शिवसेनेच्या नावानं देतोय धमक्या’

uddhav

पालघर – राज्यासह देशभरात कोरोनाने काही दिवसांपूर्वी हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचं संकट कमी झालं असले तरी अद्यापही कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच, अद्यापही कोविड सेंटर आणि कोरोना डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये रुणांवर उपचार होत आहेत.

या सेंटर्समध्ये रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधामध्ये जेवणाचीही सोय आहे. त्यानुसार, संबंधित कोविड सेंटरचा ठेका ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र, पालघरमधील एका कोविड सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेल्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत.

याबाबत, आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन माहिती दिली. कोविड सेंटरमधील जेवणात आढळलेल्या अळ्या म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड रिवेरा डेडिकेटेट कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस डाएट चिकनमध्ये अळ्या आढळल्या आहेत. याबाबत, रुग्णांनी तक्रार केल्यावर ठेकेदार शिवसेनेच्या नावाने धमक्या देतोयं. गरीब रुग्णांना वाली कोण? जिल्हाधिकारी लक्ष देतील का?, असा सवाल आमदार डावखरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये अशा पद्धतीने जेवण दिले जात असेल तर जनतेने नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित होत आहे. संबधित व्यक्तींवर ताबडतोब कारवाई करून सकस व स्वच्छ आहार पुन्हा सुरु करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP