VIDEO : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात

पुणे : पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे. यासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीन करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 7 हजार 500 पोलिसांच्या मदतीला 500 स्वयंसेवकही सज्ज आहेत.