fbpx

शेतकरी-कष्टकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद – सहकारमंत्री सुभाष देशमुख

टीम महारष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने 2019 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील सुमारे 12कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शेतकरी, कामगार, महिला यांना केंद्र बिंदू ठेवून देशाच्या विकासासाठी सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आहे. अशी प्रतिक्रीया देऊन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2019 चे स्वागत केले आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून 22 पिकांचं किमान हमीभाव वाढवला आहे. तसेच आयकर मर्यादा 2.30 लाखाहून वाढवून 5 लाखांपर्यत केली आहे.आयकर मर्यादेत वाढ करून सरकारने सर्वसामान्य आयकर खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. तर 21 हजारपर्यंत पगारअसलेल्या अंसघटीत कामगारांना 7 हजार बोनस सुद्धा या अर्थसंकल्पात नमुद केले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना 2 टक्के व्याजाची सवलत तर वेळेत कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3 टक्यांचा लाभ देण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून 1 लाख गावे डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा ग्रामविकासाला चालना देणारा उपक्रम ठरणार आहे, असे सांगून लोककल्याणकारी अर्थसंकल्पाचे श्री. देशमुख यांनी स्वागत केले.