fbpx

श्रीलंकेच्या खेळाडूंना आवडले नागपुरी झिंगे

nagpuri zinge

नागपूर-  विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर 24 नोव्हेंबर पासून सुरू होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी नागपुरात आलेल्या श्रीलंकेच्या टीमने नागपुरातील एकाहॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला. वर्धा मार्गावरील 10 डाऊनिंग स्ट्रीट हॉटेलमध्ये या खेळाडुंनीशाकाहारी जेवणासह चायनिज आणि कॉन्टीनेंटल पदार्थांचाही आस्वाद घेतला. जामठा मैदानावर दिवसभर कसून सराव केल्यानंतर संध्याकाळी श्रीलंकेच्या टीममधील कप्तान दिनेशचंडीमल, एंजेलो मॅथ्यू यांच्यासह इतर खेळाडू व सपोर्टिंग स्फाफने वर्धा मार्गावरील 10 डाऊनिंग स्ट्रीटहॉटेलकडे मोर्चा वळवला. श्रीलंकेच्या खेळाडूंचे हे फेवरेट हॉटेल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यावेळी टीमने या चमूने चायनिज, काँटिनेंटल व शाकाहारी जेवण घेतले. तर कप्तान दिनेश चंडीमलव रोषन सिव्हा याने झिंगा मासोळीची विशेष ऑर्डर दिली. त्यासोबतच या खेळाडुंनी नुडल्स, बटर चिकनफिश, थाई करी आणि फ्राईड राईस अशा पदार्थांची मागणी केली. सुमारे दोन तास हॉटेलमध्ये विविधपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमाराला हे सर्व खेळाडू आपल्या मुक्कामी परतलेत.