जागतीकीकरणामुळे भाषांचे सपाटीकरण -डॉ. केशव तुपे

languages globalization

चाळीसगाव : जागतीकीकरण, व्यवस्थेची अनास्था व नवअभ्यासक तसेच प्राध्यापकांच्या उदासिनतेमुळे भाषांचे सपाटीकरण होत असुन बहुभाषिकतेची ओळख पुसली जात असल्याचे मत जळगाव उच्च्‍ शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (दि. १८) य. ना. चव्हाण महाविदयालय व विदयापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय स्तरावर मराठी भाषा आणि साहीत्याच्या संशोधनाचे व अभ्यासाचे स्वरूप या विषयावर आयोजीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रांच्या वेळी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन साहीत्यिक रविंद्र शोभणे, हंसराज खोमणेकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, सचिव अरूण निकम, ‍शशिकांत सांळुखे, धनंजय देशमुख, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. पुणे विदयापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश अवलगावकर यांनी बीजभाषन केले.मराठी भाषा टिकविण्यासाठी नवसाहीत्यीक व संशोधकांनी समाज मनाचे प्रतिबिंब उमटवणारे साहीत्य निर्माण केले पाहीजे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे भाषेची व्याप्ती बदलत चालली आहे. मराठी भाषा व साहीत्याचे प्राध्यापक तसेच संशोधकांनी मराठी भाषेचे स्थान व गौरव वाढविण्यासाठी, मराठी साहीत्यांच्या प्रसार होण्यासाठी यथोचीत प्रयत्न करावे असे आवाहन डॉ. तुपे यांनी केले. यानंतर डॉ. अविनाश अवलगावकर यांनी भाषा हे ज्ञान नसुन कौशल्य विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषेता भक्क्म पाया संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी घालुन दिला असुन मराठी भाषेचा पाया मजबुत असल्याने मराठी भाषेची चिंता करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा उपस्थितां समोर मांडला. चर्चासत्राच्या समन्वयिका प्रा. डॉ. अनिता नाईक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. आर.पी. निकम व प्राध्यापिका एन.पी गोल्हार यांनी केले. आभार प्रा. के. पी. रामेश्वरकर यांनी मानले.