मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रोच्या डब्यांच्या कारखान्याचं भूमीपूजन

देवेंद्र फडणवीस

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या कारखान्याचं भूमीपूजन संपन्न झाले. लातूर येथे होऊ घातलेल्या कारखान्याची उभारणी विक्रमी वेळेत पूर्ण करून येत्या दीड वर्षामध्ये प्रत्यक्ष मेट्रो रेल्वेचे डबे तयार होऊन बाहेर पडतील, असा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.

त्यानंतर क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची या वेळी उपस्थिती होती. पीयूष गोयल पुढे म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारकडून महाराष्ट्रात ५८५७ कोटी रुपयांची रेल्वेची काम महाराष्ट्रात सुरू होती. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये हा आकडा २४ हजार कोटी एवढा आहे.