अखेर लालूंचा फैसला ७ जानेवारीला

Lalu-Prasad-Yadav

टीम महाराष्ट्र देशा: लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेचा निकाल पुन्हां एकदा लांबला आहे. या आधी दोन वेळा निकाला पुढे ढकलण्यात आला होता. विशेष सीबीआय न्यायालयाव्दारे आता शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येईल.

न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले होते. तब्बल २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. लालूंनी माझ्या प्रकृतीचा विचार करून कमीत कमी शिक्षा करावी अशी विनवणी यादव यांनी न्यायाधीशांना केली आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलने न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले जाणार असून राजकीय संघर्षही सुरूच ठेवण्याचे स्पष्ट केले.Loading…
Loading...