‘या’ कारणासाठी लालूंना मिळाला ५ दिवसांचा पेरोल

lalu prasad yadav

नवी दिल्ली – चारा घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव याचा १२ मे रोजी विवाह होणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पेरोल मंजूर करण्यात आला आहे.

Loading...

तेज प्रताप यादव याचा विवाह पक्षाच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्यासोबत होणार आहे. पाटणा येथे हा विवाहसोहळा पार पडेल.यासाठी लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पेरोल मंजूर करण्यात आला आहे.

लालूंना बिरसा मुंडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं, मात्र तब्बेत बिघडल्यामुळे त्यांन रांचीमधील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. लालूंवर एम्स रुग्णालयातही उपचार करण्यात आले. नंतर तिथून पुन्हा त्यांना रांचीला पाठवण्यात आलं. मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहणारे लालू यादव यांना साखरपुड्याला हजेरी लावणं शक्य झालं नव्हतं. १८ एप्रिलला हा साखरपुडा झाला होता.

लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र गेल्या शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात वकिलांच्या आंदोलनामुळे सुनावणी होऊ शकली नव्हती. यामुळे पेरोलसाठी अर्ज करण्यात आला. चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवण्यात आलं असून शिक्षा सुनावण्यात आली आहे.







Loading…










Loading…

Loading...